मालवाहतूकदारांच्या संपाचा तोडगा निघेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

औरंगाबाद - दररोज होत असलेली डिझेल दरवाढ, टोलमुक्तीसह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट या काँग्रेस संघटनेच्या (एआयएमटीसी) नेतृत्वाखाली मालवाहतूकदारांनी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी बाहेरगावाहून आलेल्या पाचशे गाड्या शहरात थांबविण्यात आल्या. आतापर्यंत तीन हजार वाहने शहरात थांबल्याची माहिती औरंगबाद गुड्‌स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली.  

पेट्रोल-डिझेलचे दर देशभरात एकसमान ठेवण्यात यावेत, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमुक्त करून दर वर्षाला एकदाच ठराविक रक्कम टोल म्हणून घेण्यात यावा. थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर कमी करावेत, प्राप्तिकर विभागाच्या अटी शिथिल कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी या संघटनेच्या नेतृत्वाखाली देशव्यापी मालवाहतूदारांनी संप पुकारला आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी सहापासून संपाला सुरवात झाली. संपाच्या तिसऱ्या दिवशी वरिष्ठ पातळीवर कुठलाही तोडगा निघाला नाही. रविवारी (ता. २२) वाळूज एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी भागात जवळपास पाचशे ट्रक माल घेऊन आल्या; मात्र या सर्व गाड्या शहरात थांबविण्यात आल्या आहेत. 

सर्व ट्रकचालकांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था औरंगाबाद गुड्‌स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे करण्यात आली आली आहे. या संपामुळे इंडस्ट्रीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील मालवाहतूकदारांचे साधारण दीडशे कोटीचे नुकसान झाले आहे. याशिवाय ट्रक लोड, अनलोड करणाऱ्या कामगारांना काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाल्याचे झाल्याचे फय्याज खान यांनी सांगितले.

Web Title: transporter strike no solution