कौटुंबिक हिंसाचारपीडित महिलांवर घाटीत होणार उपचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

औरंगाबाद : महिलांना उद्भवणाऱ्या व्याधींमागे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमुख कारण असल्याचे वर्ष 1993 मध्ये डब्ल्यूएचओने केलेल्या अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. 30 ते 60 टक्के महिलांना, तर 10 ते 12 टक्के गरोदर मातांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्या डॉक्‍टरांकडे आल्यावर त्यांच्या आजाराबद्दल संवेदनशील होऊन त्यांना उपचारासोबत मानसिक पाठबळ देण्याचा प्रकल्प अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटीत राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या फळीतील डॉक्‍टर, परिचारिका व समाजसेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

जागतिक आरोग्य संघटना, मुंबईतील सेहत एनजीओ हे कौटुबिंक लैंगिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 च्या अनुषंगाने राज्यातील औरंगाबाद व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक प्रकल्प राबवत आहे. "लाईव्हस्‌'च्या माध्यमातून उपचार करून एक मॉडेल तयार करण्यात येत आहे. सहा महिने अभ्यासानंतर हे मॉडेल देशपातळीवर राबविण्याचा मानस आहे. महिनाभरापूर्वी 19 जणांचे दोन दिवसांचे, तर गेल्या आठवड्यात 17 जणांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण सेहतच्या वतीने मुंबई घाटीत डॉक्‍टरांना देण्यात आले. यामध्ये डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. भारत सोनवणे, डॉ. प्रवीण लहाने, डॉ. अनिल जोशी, स्वाती कंधारे, विजया कोल्हे, विशाल साळवे, संगीता अवसरमल, ज्योती जाधव, हेमलता मुली, लक्ष्मीकांत शिंगोटे, सत्यजित गायसमुद्रे यांचा समावेश होता. 

रुग्णालयात महिला दाखल होताच त्यांच्यावरील अत्याचार कसा ओळखावा, त्यांचे समुपदेशन कसे करावे आणि त्यांच्यावर उपचार कसे करावेत यासंदर्भात घाटीत पहिल्या फळीतील स्त्रीरोग विभाग, औषध वैद्यकशास्त्र विभाग, आपत्कालीन विभागातील जेआर 1, जेआर 2, परिचारिका, समाजसेवा अधीक्षकांना याबद्दलचे प्रशिक्षण येत्या 19 आणि 20 जुलैदरम्यान घाटीत आयोजित करण्यात आले आहे. 
-डॉ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख, घाटी.

Web Title: treatment on ladies for domestic violence in ghati hospital