शहराची ‘धूळ’धाण!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोराचा वारा सुटल्याने जिकडे-तिकडे धुळीचे लोट उठले होते. यात भर पडली ती कचऱ्याची. त्यामुळे जिकडे-तिकडे धूळ आणि पांगलेला कचरा असे चित्र होते. प्रचंड धुळीच्या लोटाने गर्दीच्या ठिकाणी थांबलेले नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानकावरील प्रवाशांसह विविध शासकीय, खासगी कार्यालये, कंपन्यात काम करणाऱ्यांची एकच धावपळ उडाली. 

दुपारनंतर अचानक तयार झालेल्या पावसाच्या वातावरणाने शहर अंधारून आले. साडेपाचच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शहरात एकच धूळधाण झाली. या घटनेत सिडको चौकातील झाड कोसळले.

काही ठिकाणी जाहिरातींचे लावलेले प्लेक्‍स उडाले, तर शिवाजीनगर भागात घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. तसेच एन-३, रेल्वेस्टेशन, प्रतापनगर यासह विविध भागांत १५ ठिकाणी झाडे कोसळली, तर क्रांतीनगरात विजेचा खांब कोसळला. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.

छावणी, सिडकोसह पाच ठिकाणी वीज गुल
अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे शहरातील समर्थनगर, उस्मानपुरा, छावणी, सिडकोतील एन-तीन, एन- चार, जवाहर कॉलनी, गारखेडा भागात लघुदाब वाहिनीवर झाडे पडली. त्यामुळे या भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अर्ध्यापाऊण तासात सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितले.

Web Title: tree colapse by wind