सकाळच्या पुढाकाराने माळरानावर बहरणार दोनशे बोधिवृक्ष

अनिल जमधडे
मंगळवार, 5 जून 2018

सकाळच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आम्रपाली महिला मंडळ व डिफेन्स करिअर अकॅडमीतर्फे वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला होता. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 5) सुधाकरनगर येथील टेकडीवर भदन्त सुदत्त बोधी यांच्या उपस्थित बोधीवृक्ष (पिंपळ) लागवड करुन हा उपक्रम सुरु करण्यात आला. 
 

औरंगाबाद : सकाळच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आम्रपाली महिला मंडळ व डिफेन्स करिअर अकॅडमीतर्फे वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला होता. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 5) सुधाकरनगर येथील टेकडीवर भदन्त सुदत्त बोधी यांच्या उपस्थित बोधीवृक्ष (पिंपळ) लागवड करुन हा उपक्रम सुरु करण्यात आला. 

सकाळच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धन कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महिला मंडळाच्या अध्यक्षा जोत्सनाताई कांबळे व राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक झाड लावून कृती कार्यक्रमाला सुरवात झाली. पाऊस पडताच या परिसरात दोनशे बोधिवृक्ष लावण्यात येणार आहेत. शंभर टक्के आणि चोवीस तास ऑक्‍सीजन देणारा पिंपळ पर्यावरणासाठी अत्यंत महत्वपुर्ण वृक्ष असल्याने, संपुर्ण परिसरात बोधिवृक्ष लावण्यात येत असल्याचे श्रीमती कांबळे यांनी सांगीतले.
 

Web Title: Tree plantation program arranged by sakal