सोयगाव तालुक्यात वृक्षलागवड योजनेचे तीनतेरा, वनमहोत्सव बारगळला

soygao
soygao

जरंडी (औरंगाबाद) : सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या तिन्ही रोपवाटिकामध्ये लागवड करून वृक्षारोपणासाठी जतन करण्यात आलेल्या वृक्षांचे अद्याप ग्रामपंचायत आणि इतर शासकीय कार्यालयांना वृक्षांचा पुरवठा झालेला नाही, त्यातच बाहेर विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वृक्षांची किंमत वाढीव दराने आकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची वाजवी दरात वृक्ष खरेदीची ऐपत नसल्याने शासनाच्या वृक्ष लागवड योजनेचा फज्जा उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शासनाच्या वतीने १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या वनमहोत्सव उपक्रमाचे वृक्ष वितरणाअभावी बोजवारा उडाला आहे.त्यातच वनमहोत्सवा पाठोपाठ एक जुलै ते सात जुलै आठवडाभरात विशेष वृक्षारोपण राबविण्यात येणार आहे.यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या विविध प्रजातीचे ७० हजार डेरेदार वृक्ष तयार असून या वृक्षांची संबंधित विभागाने अद्याप ग्रामपंचायती कार्यालयापर्यंत पोहोच केलेली नाही.सामाजिक वनीकरण विभागाकडे ग्रामपंचायतींना द्वारपोच वृक्ष वितरणाची जबाबदारी देण्यात आली आहे.परंतु सामाजिक वनीकरण विभागाकडून अद्याप हि जबाबदारी पार पडलेली नसल्याने ग्रामपंचायतींच्या वतीने होणारे गावपातळीवरील वृक्षारोपण अडचणीत आले आहे.

तसेच वनविभागाकडून दोन रोपवाटिकामध्ये तयार करण्यात आलेल्या पाच लाख डेरेदार वृक्षे डोलात उभे असतांना, तर अठरा महिन्याच्या रोपांची किंमत ४० ते ७५ पर्यंत घोषित झाल्याने शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर रोपांच्या किंमती झाल्याने सर्वसामान्य शेतकरी या रोपांची खरेदी करू शकणार नसल्याने,वृक्ष लागवड मोहीमही अडचणीची ठरली आहे.वृक्ष लागवड मोहिमेला केवळ चारच दिवस शिल्लक असतांना सामाजिक वनीकरण विभागाचे रोपे अद्यापही रोपवाटिकेतच मुक्कामी असून वनविभागाची रोपेही लागवडीच्या प्रतीक्षेत आहे.

संबंधित विभागांची उदासीनता मोहीम रखडण्याला कारणीभूत ठरू शकते.सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमींना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावी वनमहोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात अद्यापही रोपे उपलब्ध न झाल्याने वनमहोत्सव बारगळला आहे.दरम्यान तालुका लागवड अधिकारी सय्यद काजी यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांचाशी संपर्क होवू शकला नाही.वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी काळे यांचेशी संपर्क केला असता, इतर एजन्सीने वनविभागाकडे वृक्ष मागणीची डिमांड दिल्यावर सदरील कार्यालयात प्रत्यक्ष येवून रोपांची वाहतूक करावी असे त्यांनी सांगितले. दरम्यान वनविभाग आणि इतर एजन्सीच्या वादात शासकीय कार्यालयांची वृक्ष लागवड अडकली आहे.त्यामुळे ऐन तोंडावर आलेल्या मोहिमेचा फज्जा उडणार असल्याचे चित्र सोयगावला निर्माण झाले आहे.

वनमहोत्सवात एकही वृक्षांची लागवड नाही-
दरम्यान शासनाने पंधर जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव आणि त्यानंतर वृक्ष लागवड सप्ताह असे मोहिमेचे नियोजन केले असताना, वनमहोत्सव काळात रोपांची उपलब्धता न झाल्याने सोयगाव तालुक्यात वनमहोत्सव साजरा झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com