"झाडे लावा, झाडे जगवा' म्हणत सयाजी शिंदे करणार प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

औरंगाबाद - पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने सतत दुष्काळाशी येथील जनतेला करावा लागणारा संघर्ष लक्षात घेऊन अभिनेते सयाजी शिंदे आता मराठवाड्यात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगणार आहेत. केवळ झाडे लावा नव्हे, तर "झाडे लावू, झाडे जगवू,' असा संदेश देत ते निसर्गावर प्रेम करायला सांगणार आहेत.

दुष्काळासह अन्य संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात वनराईचे कमी प्रमाण चिंता वाढविणारे आहे. यावर अनेक वर्षांपासून केवळ चर्चा होते. मात्र, उपाय म्हणून फारसे प्रयत्न झाले नाहीत. ही गरज ओळखून सयाजी यांनी पुढाकार घेत प्रशासनासोबत वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागी होत जनतेचे प्रबोधनही करतील.

दरम्यान, मंगळवारी (ता. 22) त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर डॉ. भापकर म्हणाले, की राज्यात या वर्षी 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार असून, मराठवाड्यास 2 कोटी 91 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, विभागातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही 4 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. यात सयाजी शिंदे हे योगदान देणार आहेत.

Web Title: tree plantation tree save sayaji shinde publicity