दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता. परळी) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह नेत्यांनी अभिवादन केले.

जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित आरोग्य शिबीराचे उद॒घाटन यावेळी पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, अमित पालवे, गौरव खाडे, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, राधाताई सानप, आमदार मोनिका राजळे, आमदार आर. टी. देशमुख, आमदार सुरेश धस, आमदार भीमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, भाऊराव देशमुख, रमेश पोकळे, आदित्य सारडा, डॉ. स्वरूपसिंह हजारी, फुलचंद कराड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात उपस्थित होते.

दरम्यान, शिबीरात विविध आजारांचे निदान आणि उपचार केले जात आहेत. यावेळी विविध शासकीय येाजनांतून तलाठ्यांना लॅपटॉप वाटप, बचत गटांना कर्ज वाटप, घरकुल योजनांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Tribute to Bjp s senior leader Gopinath Munde in Beed