कोपर्डीच्या भगिनीसह हुतात्मा बांधवांना वाहण्यात येणार श्रद्धांजली

अतुल पाटील 
मंगळवार, 9 जुलै 2019

कोपर्डी येथे तीन वर्षापुर्वी नराधमांची शिकार झालेल्या भगिनीला आणि मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या 44 मराठा बांधवांना 13 जुलैला राज्यभर गाव, तालुका, जिल्हा पातळीवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

औरंगाबाद : कोपर्डी (जि. नगर) येथे तीन वर्षापुर्वी नराधमांची शिकार झालेल्या भगिनीला आणि मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या 44 मराठा बांधवांना 13 जुलैला राज्यभर गाव, तालुका, जिल्हा पातळीवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. 

औरंगाबाद येथील सिंचन भवन येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. कोपर्डी येथे 13 जुलै 2016 ला एका निष्पाप मुलीवर अत्याचार करुन तिचा खुन करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट 2016 ला औरंबादेत पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला. त्यानंतर राज्यभर ऐतिहासिक मोर्चे निघाले. कोपर्डी घटनेला तीन वर्ष उलटले तसेच मराठा आरक्षणासाठी 44 समाज बांधव हुतात्मा झाले. त्या सर्वांना गाव, तालुका, जिल्हा पातळीवर 13 जुलैला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 

कोपर्डी घटनेतील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर प्रयत्न करावेत, असा सुर या बैठकीत उमटला. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय काकडे, सुरेश वाकडे, मनोज गायके, आत्मराम शिंदे, रमेश गायकवाड, शिवानंद भानुसे, शिवाजी जगताप, राहुल बनसोड, विकीराजे पाटील, अमोल साळुंके, बाबासाहेब दाभाडे, रेखाताई वहाटुळे, रविंद्र वहाटुळे, सुवर्णा मोहिते, अभिजीत काकडे, प्रदीप हारदे, अजय गंडे, किशोर घोडके, सतीष जगताप, अक्षय रोडे यांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tribute by marathi kranti morcha for victim of Kopardi