भारत जोडो पदयात्रेतील गणेशन यांना श्रद्धांजली अर्पण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले गुरुवारी (ता. दहा)) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महादेव पिंपळगाव (ता. अर्धापूर) येथील देशमुख मंगलकार्य येथे ट्रकने दोघांना उडविले होते.

भारत जोडो पदयात्रेतील गणेशन यांना श्रद्धांजली अर्पण!

अर्धापूर - भारत जोडो यात्रेतील गणेशन यांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव पार्डी (ता. अर्धापूर) येथे आणले होते. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले गुरुवारी (ता. दहा)) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास महादेव पिंपळगाव (ता. अर्धापूर) येथील देशमुख मंगलकार्य येथे ट्रकने दोघांना उडविले होते. या अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान गणेशन (तामिळनाडू) यांचा मृत्यू झाला होता. गणेशन यांना खासदार राहुल गांधी, आमदार अशोक चव्हाण, आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी श्रद्धांजली अर्पण केले. आणि त्यांचे पार्थिव तामिळनाडूकडे रुग्णवाहिकेने तामिळनाडू कडे पाठविण्यात आले आहे.