ट्रकला दुचाकी धडकली; एक ठार

ट्रकला दुचाकी धडकली; एक ठार

औरंगाबाद : ऐन महामार्गावरच कुठलेही इंडिकेटर किंवा इतर तत्सम वस्तु न ठेवता उभी असलेली ट्रक अंधारात न दिसल्याने दुचाकी धडकुन दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना जालना महामार्गावरील गाढेजळगाव (ता.औरंगाबाद) शिवारात रविवारी (ता.13) पहाटे सहा वाजता घडली.

या घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेले मोतीराम खरात (वय 50) यांचा मृत्यू झाला, तर दुचाकी चालक मुलगा श्रीराम खरात हा गंभीर जखमी झाला. औरंगाबाद येथील जालान नगरचे रहिवासी असलेले मोतीराम धोंडू खरात (वय 50) व त्यांचा मुलगा श्रीराम मोतीराम खरात हे सकाळी घरून साडेपाचच्या सुमारास मेहकर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी होंडा डिलक्स या दुचाकी (एमएच 20, एफ बी 2622) वरून निघाले होते.

पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गाढेजळगाव शिवारात आली असता समोर एक ट्रक (एमएच 48, एजी 2829) हा महामार्गावरच उभा होता. तथापि, अंधारात त्यांना हा ट्रक दिसला नाही, त्यांची दुचाकी ट्रकच्या पाठीमागील संरक्षण जाळीच्या आत जाऊन घुसली. यात दुचाकी चालक श्रीराम हा दुरवर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. तर पाठीमागे बसलेले वडील ट्रकला जाऊन आदळल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com