क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहून नेणारे ट्रक पकडले, दंड ठोठावला

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 11 जुलै 2018

कुंडलवाडी (नांदेड) : येथुन जवळच असलेल्या माचनुर येथील शासकीय वाळु घाटावरून क्षमतेपेक्षा अधिक वाळु वाहुन नेणारे 25 ट्रक व टिप्पर कुंडलवाडी पोलीसांनी पकडले होते. सर्व वाहने बिलोली तहसीलकडे सुपुर्द केले होते. त्यातील 5 वाहनांना 9 जुलै रोजी 9 लाख 90 लाख रूपयांचा दंड लावण्यात आला होता. उर्वरित 18 ट्रक व टिप्परचा पंचनामा बिलोली महसुल विभागाकडुन पुर्ण झाला असुन 18 पैकी 15 वाहनांचे राँयल्टीच्या पावत्या अवैध तर 3 वाहनांचे पावत्या वैध आढळले. त्यामुळे 15 वाहनांवर 30 लाख 30 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कुंडलवाडी (नांदेड) : येथुन जवळच असलेल्या माचनुर येथील शासकीय वाळु घाटावरून क्षमतेपेक्षा अधिक वाळु वाहुन नेणारे 25 ट्रक व टिप्पर कुंडलवाडी पोलीसांनी पकडले होते. सर्व वाहने बिलोली तहसीलकडे सुपुर्द केले होते. त्यातील 5 वाहनांना 9 जुलै रोजी 9 लाख 90 लाख रूपयांचा दंड लावण्यात आला होता. उर्वरित 18 ट्रक व टिप्परचा पंचनामा बिलोली महसुल विभागाकडुन पुर्ण झाला असुन 18 पैकी 15 वाहनांचे राँयल्टीच्या पावत्या अवैध तर 3 वाहनांचे पावत्या वैध आढळले. त्यामुळे 15 वाहनांवर 30 लाख 30 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकुण 25 पैकी 20 वाहनांचे राँयल्टी पावत्या अवैध आढळल्या मुळे त्यांना 34 लाख 20 हजार रूपये दंड ठोठाविला आहे. तसा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविला असल्याचे माहिती तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

माचनुर येथील शासकीय वाळुघाटावरून क्षमतेपेक्षा अधिक वाळुची वाहतुक मोठ्या प्रमाणात चालु होती.धर्माबादचे  पोलीस उपविभागीय अधिकारी नुरूल हसन यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला.त्यांच्या आदेशानुसार कुंडलवाडी पोलीसांनी 7 जुलै रोजी माचनुर वाळुघाटावरून वाळुची ओव्हरलोड वाहतुक करणारी 25 ट्रक व टिप्पर पकडली  होती. त्यातील 7 ट्रक 7 जुलै रोजी बिलोली महसुल विभागाकडे ताब्यात दिल्यानंतर त्यातील 7 पैकी 5 वाहनांचे राँयल्टी पावत्या अवैध आढळल्या होत्या. त्यानुसार 9 जुलै रोजी या 5 वाहनांना 9 लाख 90 हजार रूपये दंड ठोठावला होता. उर्वरित 18 वाहनांचा पंचनामा आज दि.10 जुलै रोजी मंडळ अधिकारी रोहीदास मेहत्रे,मंडळ अधिकारी तोटावार, माचनुरचे तलाठी चमकुरे यांनी पुर्ण करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला होता.यात 18 पैकी 15 वाहनांचे राँयल्टी पावत्या अवैध तर 3 वाहनांचे पावत्या वैध आढळल्या.पंचनामाच्या अहवालानुसार 15 वाहनांवर 30 लाख 30 हजार रूपयांचा दंड लावण्यात आला.

Web Title: truck caught by police for extra soil contains