धारूर घाटात अपघातात ट्रक चालक ठार

प्रकाश काळे 
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

किल्ले धारुर (बीड) - शहरानजीकच्या घाटात अपघाताची मालीका सुरूच असून महीनाभरात एकाच वळणावर तिसरा अपघात घडला आहे. शुक्रवारी ता.24 सकाळी ब्रेक फेल होवून हायब्रीड ज्वारीचा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. चालक व क्लिनर बचावले आहेत.

खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय मार्गावर शहराच्या उत्तरेस धोकादायक वळणे असलेला एककिमी अंतराचा घाट आहे. हा घाट अरूंद असल्याने नवीन वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने नेहमीच अपघात होतात. गत महीना भरात एकाच वळणाच्या ठिकाणी अपघात घडण्याची तिसरी घटना आहे . शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हायब्रीड ज्वारीने भरलेला ट्रक एम.एच.४० बीजी -२३०२ हा लातूरहून - नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जात होता. ट्रक घाटाच्या शेवटच्या धोकादायक वळणाच्या ठिकाणी आला असता चालक घेअर टाकत असताना ब्रेक न लागल्याने कठड्याला धडक लागून पलटी झाला. अपघातात चालक व मालक असलेले रंगनाथ माणीक भीसे रा.गोढाळ ता.लातुर यांच्या अंगावर ट्रक पडल्याने जागीच मृत्यू झाला. यात बाबासाहेब माने रा.लातुर व बबन तेलंगे रा. औसा हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Web Title: Truck driver killed in road accident