समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न - पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी घटक व समविचारी पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीड जिल्हा परिषदेतही तसा प्रयत्न केला जाणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्या प्रमाणे जिल्हा परिषदांमध्ये एकत्र येत आहे त्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या समविचारी पक्षांना निश्‍चित सोबत घेऊ अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (ता.2) माध्यमांशी बोलताना दिली. 

जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी भाजप-शिवसेना एकत्र आल्यावर सत्ता येऊ शकते, या प्रश्‍नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, या संदर्भात स्थानिक पातळीवरसुद्धा चर्चा केली जात आहे. जिथे जिथे भाजप-शिवसेनेची एकमेकांना गरज आहे तिथे सोबत यावे. ग्रामीण भागातील रस्त्यांविषयी त्या म्हणाल्या, की रस्त्यांची अवस्था वाईट असली तरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते केले जात आहेत. वर्षभरात आणखी चांगले रस्ते होतील. जिल्हा परिषदेअंतर्गत जे जिल्हा मार्ग आहेत, त्यांच्या निकृष्ट कामांच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदांकडून जास्तीत जास्त रस्ते करण्यासाठी निधी वाढवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून पक्के रस्ते करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Web Title: Try to gather like-minded parties