मराठा आरक्षणासाठी आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

आळंद - राज्य शासन मराठा समाजाच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करीत असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील सताळा पिंप्री (ता. फुलंब्री) येथील महिलांसह दीडशेवर समाजबांधवांनी रविवारी (ता. दोन) आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी गावाला छावणीचे स्वरूप आले. विशेष म्हणजे या आंदोलनात उमरावती, पेंडगाव, उमरावती, सताळा, आळंद येथील डॉक्‍टर, व्यावसायिक, विद्यार्थीही सहभागी झाले. 

समाजबांधवांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी; तसेच विभागीय आयुक्तांना २१ सप्टेंबरला निवेदन देऊन आत्महत्येची परवानगी मागितली होती. शैक्षणिक व प्रशासकीय नोकरीत आरक्षण नसल्याने इतर समाजांच्या तुलनेत मराठा समाज बेरोजगार झाला आहे. मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. यात समाजाने केलेल्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास दोन ऑक्‍टोबरला सताळा पिंप्री येथे सामुदायिक आत्मदहन करू, असे निवेदनात म्हटले होते. 

मात्र, यावर अजून तोडगा न निघाल्याने समाजबांधवांनी टोकाचे पाऊल उचलले. सकाळी दहाला समाजबांधव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात एकत्र आले. 

तहसीलदार संगीता चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पी. पी. इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक जी, व्ही. शेळके यांनी समजूत काढून शासनकडे भावना कळविल्या जातील, असे आश्‍वासन दिले. पोलिसांनी आत्मदहनासाठी आणलेले रॉकेल, पेट्रोल व इतर साहित्य जप्त केले.

तहसीलदार संगीता चव्हाण यांनी सांगितले, की आज महाराष्ट्रात शांततेच्या मार्गाने मोर्चे निघत आहेत. त्यामुळे सर्वांनी अनुकरण करून शांततेचा मार्ग स्वीकारावा. मागण्या शासनापर्यंत पोचवू.

दत्तात्रय पवार, जगन्नाथ पवार, गोकुळ जंजाळ, पुंडलिक देवरे, साहेबराव देवरे, जगन्नाथ बांबर्डे, विठ्ठल देवरे यांच्यासह १५० जणांनी आत्मदहनासाठी पेट्रोल, रॉकेल सोबत आणले. 

 हिवाळी अधिवेशनात मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा देण्यात आला. 

Web Title: try maratha reservation self-combustion