तुळजाभवानीच्या भक्तांसाठी तीन धर्मशाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

तुळजापूर - तुळजाभवानीमातेच्या भाविकांसाठी शहरात तीन ठिकाणी धर्मशाळा सुरू होणार आहेत. तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या निधीतून तुळजाभवानी मंदिर समितीच्या दोन आणि नगरपालिकेची एक धर्मशाळा तयार झाली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने घाटशीळ रस्त्यावर 14 कोटी रुपये खर्चून 144 खोल्यांची धर्मशाळा तयार झाली आहे.

त्यात 54 वातानुकूलित, 12 अतिउच्च दर्जाच्या, तर 78 साधारण खोल्या आहेत. तुळजाभवानी मंदिराजवळ 24 खोल्यांची, तर नगरपालिकेमार्फत 45 खोल्यांची धर्मशाळाही तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान, घाटशीळ रस्त्यावरील धर्मशाळेत उपाहारगृह सुरू होणार असल्याने भाविकांची सोय होणार आहे.

Web Title: tuljabhavani bhakt Dharmashala

टॅग्स