तुळजापूर : अश्विनी पौर्णिमेदिवशी फुलांनी सजविले मंदिर

Tuljapur
Tuljapur

तुळजापूर : अश्विनी पौर्णिमेनिमित्त  बुधवारी(ता. 24) तुळजाभवानी मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. पुणे येथील भवानी पेठ भागातील व्यावसायिक आर. आर. किराड यांनी ही सजावट केली.

तुळजाभवानी मंदिरात मंगळवार (ता. 23) रात्रीपासून फुलांनी मंदिर सजविण्यास सुरवात करण्यात आली. वेगवेगळे तोरणे, फुलांची आरास करण्यात आली आहे. यासंदर्भात श्री. किराड यांच्या वतीने नरेश जवाहर किराड यांनी सांगितले की, ही सजावट ७५ कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवसांत पूर्ण केली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सजावटीसाठी तीन हजार किलो झेंडू, एक हजार किलो शेवंती फुले तसेच कार्नेशयन, गुलाब, ऑर्केड, अनथोरियन, कामानी शेवंती यांचे 20  ते 25 हजार बंडल फुले आणली आहेत.

तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर फुलांचे दोन गज (हत्तीच्या प्रतिकृती) तयार करण्यात आले आहेत. होमकुंड, तुळजाभवानी मातेचा गाभारा, सीमोल्लघंन पारावर महिषारसुरमर्दिनीची प्रतिमा फुलांनी तयार करण्यात आली आहे.  तुळजाभवानी मातेच्या राजे शहाजी महाद्वारावर त्रिशूल-डमरूचे तोरण लावण्यात आले.

किराड यांनी देवीचा गाभारा फळांनीही सजविला होता. सर्व प्रकारची फळे लावण्यात आली होती. या फुलांच्या रोषणाईचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, भारती गमे यांनी बुधवारी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com