तुळजापुरात मोठी चिंता, कशी पार पडणार यात्रा

Osmanabad News
Osmanabad News

तुळजापूर : तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा येत्या (ता. आठ) एप्रिल रोजी होणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यात्रा कशी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

तुळजाभवानी मातेची चैत्री यात्रा ही वर्षातील मोठी यात्रा असते. प्रामुख्याने शेतकरी वर्गाची सुगीची कामे झाल्यानंतर ही यात्रा असल्यामुळे परंपरेने येणारा भाविक वर्ग आहे. कोरोना व्हायरस या आजाराच्या वाढलेल्या प्रादुर्भावानंतर तुळजाभवानी मंदिर समितीने उपाययोजनांसाठी पाऊल उचललेले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने भाविकांकडून यात्रेसाठी कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागलेले आहे. विशेषतः पुणे, मुंबई, तुळजापूर शहरापासून सीमावर्ती भागात असणाऱ्या कलबुर्गी, विजापूर या भागातील काही भाविकांनी येत्या चार दिवसांत आणि मागील दोन ते चार दिवसांत निश्चित केलेले दर्शनाचे आणि पुजांचे कार्यक्रम स्थगित केलेले आहेत.

सशुल्क दर्शनास अल्प प्रतिसाद

तुळजा भवानी मंदीरात शुक्रवारी (ता. 13) सशुल्क दर्शनास म्हणावा तेवढा प्रतिसाद असल्याचे दिसून आलेले नाही. शहरातील व्यापारपेठेतील व्यावसायिकांनी कोरोना व्हायरसमुळे व्यवसायाचा पुढील महीन्याचा कालावधी कसा राहील याबाबत संभ्रमाअवस्था व्यक्त केलेली आहे.

शहरातील बहुतांशी बाजारपेठेतील व्यापारी मार्च महिन्याच्या अखेरीस अथवा चैत्री पौर्णिमेनंतर जागा मालकांचे भाडे (किराया) देतात. व्यापाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न चांगले आल्यास त्यांच्या गरजा व्यापारी पूर्ण करू शकणार नाहीत.

तुळजाभवानी मंदिर समिती कोरोना व्हायरस या आजाराबाबत जनजागृती तसेच भाविकांना फ्लेक्स (फलकाद्वारे) द्वारे माहीती दिलेली आहे. येत्या काही दिवसांत चैत्री यात्रेसंद॔भात तुळजा भवानी मंदीर समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अजून उपाययोजनांबाबत मंदीर समितीचे धोरण समोर येईल.

जनजागृतीसाठी ऑडीओ क्लिप

तुळजाभवानी मंदिर समितीने कोरोना व्हायरसबाबत भाविक, नागरिक तसेच सर्वांना जनजागृती व्हावी यासाठी ऑडीओ क्लिप केली आहे. तुळजाभवानी मंदीर समितीने एक चांगले काम ऑडीओ क्लिप काढून केलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com