यात्रा अनुदान अपहारप्रकरणी तीन ठेकेदारांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

तुळजापूर - येथील नगरपालिकेच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी तीन ठेकेदारांना तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 1) दिला. नगरपालिकेच्या एक कोटी 62 लाख रुपयांच्या यात्रा अनुदान अपहारप्रकरणी 28 मार्च 2017 ला 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ठेकेदार दत्ता गवळी, अमर नाईक, नागनाथ गवळी हे आज पोलिसांपुढे हजर झाले. तपास अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खांडवे यांनी या तिघांना न्यायालयासमोर उभे केले. या ठेकेदारांनी बनावट बिले काढली आहेत, त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडी देण्याचा आदेश दिला.
Web Title: tuljapur marathwada news Three co-accused in police custody

टॅग्स