महामार्ग लातूरमधूनच जाणार

लातूर - येथील राजीव गांधी चौकातून तुळजापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ जाणार आहे.
लातूर - येथील राजीव गांधी चौकातून तुळजापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ जाणार आहे.

लातूर - तुळजापूर ते नागपूर हा महामार्ग लातूर शहरातून जाणार की कव्हा, बाभळगाव (ता. लातूर) या गावांच्या शिवारातून जाणार याबाबत चर्चा सुरू होती; पण हा महामार्ग लातूर शहरातून राजीव गांधी चौकातून जाणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. 

यासंदर्भात औसा ते चाकूर या मार्गाची तसेच छत्रपती चौक- पीव्हीआर- एमआयडीसी- नवीन रेणापूर नाका- पानगाव या रस्त्याच्या एकूण १,१०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच या कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

हा महामार्ग शहरातील राजीव गांधी चौकातून बाभळगाव नाका, नांदेड नाकामार्गे जाणार आहे. यात बसवेश्वर चौक व बाभळगाव नाका येथे पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे कव्हा, बाभळगावच्या चर्चेला आता ब्रेक लागला आहे. 

तुळजापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ आहे. तुळजापूरपासून औशापर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता औसा ते चाकूर या ५८.५१ किलोमीटर अंतराच्या कामासाठीची ८५० कोटींची निविदाही काढण्यात आली आहे. 

तसेच विजापूर ते देवगाव फाटा हा राष्ट्रीय महामार्ग ५४८ (ब)देखील शहरातून जाणार आहे. येथील औसा रस्त्यावरील छत्रपती चौक - पीव्हीआर- एमआयडीसी- नवीन रेणापूर नाकामार्गे पुढे पानगावपर्यंत जाणार आहे. यातील २२५ कोटी रुपयांच्या कामाला सुरवात झाली आहे. या महामार्गामुळे शहरातील सर्व वळण रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार असून ते चौपदरी राहणार आहेत. तुळजापूर ते नागपूर या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. 

ठळक वैशिष्ट्ये
औसा ते चाकूर ८५० कोटींचे काम
छत्रपती चौक ते पानगाव २२५ कोटींचे काम
राजीव गांधी चौक ते बाभळगाव महामार्ग जाणार
राजीव गांधी चौकात जंक्‍शन 
बसवेश्वर चौक, बाभळगाव चौक पादचारी पूल
वळण रस्ते चारपदरी, सिमेंट काँक्रिटचे
लामजना येथे टोलनाका, आष्टामोड येथे उड्डाणपूल
चाकूर, अहमदपूर, शिरूर ताजबंदसाठी बायपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com