तुळजाभवानी मातेच्या थेट दर्शनासाठी शुल्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या थेट दर्शनासाठी शंभर रुपये, तसेच अभिषेकासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय तुळजाभवानी देवस्थान समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. चार) घेण्यात आला.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या थेट दर्शनासाठी शंभर रुपये, तसेच अभिषेकासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय तुळजाभवानी देवस्थान समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. चार) घेण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विश्वस्त सदस्य आमदार मधुकरराव चव्हाण, विश्वस्त डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार दिनेश झांपले आदी उपस्थित होते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, सिद्धिविनायक ट्रस्ट (मुंबई), शिर्डी येथील साईबाबा, कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवी मंदिरातील पूजेच्या दर्शनाच्या दराबाबत चर्चा केली होती. व्हीआयपी थेट दर्शनासाठी प्रत्येकी दोनशे रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. आमदार श्री. चव्हाण यांनी शुल्क आकारून दर्शन हा चुकीचा पायंडा आहे, अशी भावना व्यक्त केली. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक सर्व स्तरांतील आहेत, असे मत त्यांनी मांडून अभिषेक शुल्कवाढ मोठ्या प्रमाणावर करू नये, असे सांगितले. डॉ. गिरासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभिषेकासाठी मंदिर समिती शुल्क शंभर रुपये घेणार आहे; तसेच कोणत्याही भाविकाने शंभर रुपये दिल्यास त्यास थेट दर्शन करण्यात येणार आहे. आम्ही सर्व देवस्थान समितीचा अभ्यास करून वरील निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: tuljapur news tuljabhavani mandir