तुरीचे निकृष्ट वाण; शेतकऱ्यांची खंडपीठात धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

औरंगाबाद - कृषी विभागाने लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाटलेल्या बियाण्याच्या निकृष्ट वाणाला शेंगा आल्याच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला नोटीस बजावली आहे.

चिमाचीवाडी (ता. उदगीर) येथील 154 शेतकऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार 2016 च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तुरीचे आयसीपीए-2740 हे वाण वाटप करण्यात आले. तब्बल 154 बॅगचे वाटप झाले होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकरी आठ ते दहा क्विंटल तुरीचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे आश्वासन दिले होते; मात्र 200 ते 220 दिवस पूर्ण होऊनही तुरीच्या पिकाला शेंगा आल्याच नाहीत. हाच अनुभव आल्याने औसा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दिली.

Web Title: tur crop problem