खरं सांग, तूर कोणाची आहे? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

लातूर - येथील शासकीय तूर खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अचानक भेट दिली. तेथे काही ट्रक, टेम्पो, लहान वाहने रांगेत त्यांना दिसून आली. त्यांतील एका ट्रकचालकाला त्यांनी जवळ बोलावले. "ट्रक कोणाचा आहे? कागदपत्रे कोठे आहेत? तूर व्यापाऱ्यांची आहे का?, तूरउत्पादक शेतकरी कोठे आहेत?' असे प्रश्न त्यांनी विचारल्याने ट्रकचालक गोंधळून गेला. सुरवातीला त्याने काहीच उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे जी. श्रीकांत त्यांनी त्याला बाजूला विश्वासात घेऊन "खरं सांग तूर कोणाची आहे?' असे विचारले. त्या वेळी ट्रकचालक बोलू लागला; पण ही तूर शेतकऱ्यांचीच असल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी येथील गूळ मार्केटमध्ये सुरू असलेल्या शासकीय तूरखरेदी केंद्राला भेट दिली. किती तूर येत आहे? तुरीचे मोजमाप व्यवस्थित केले जात आहे का? त्याच्या नोंदी व्यवस्थित केल्या जात आहेत का? कागदपत्रांची तपासणी केली जात आहे का? व्यापाऱ्याची तूर येत आहे का? या सर्वांची पाहणी केली. तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी या खरेदी केंद्रावर रांगेत असलेल्या वाहनांकडे मोर्चा वळवला. तेथे एक ट्रकभर तूर त्यांना दिसली. त्या ट्रकच्या चालकाला त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरवात केली. 

ट्रक कोणाचा आहे?, कागदपत्रे कोठे आहेत?, तूर व्यापाऱ्यांची आहे का?, तूर उत्पादक शेतकरी कोठे आहेत? असे प्रश्न त्यांनी विचारल्याने ट्रकचालक पहिल्यांदा गोंधळून गेला. सुरवातीला त्याने काहीच उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संशय अधिक वाढला. त्यामुळे जी. श्रीकांत त्यांनी त्याला बाजूला विश्वासात घेऊन "खरं सांग तूर कोणाची आहे?' अशी विचारणा केली. त्यावेळी ट्रकचालक बोलू लागला. ही सर्व तूर शेतकऱ्यांचीच आहे. चिंचोली बल्लाळनाथ येथील आठ-दहा शेतकऱ्यांची ही तूर आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी कोठे आहेत याची विचारणा केली. सर्व शेतकरी समोर आल्याने ही तूर शेतकऱ्यांचीच असल्याचे समोर आले. 

नवीन मार्केटला सहकार्य 
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत बाजार समितीच्या कार्यालयात आले. सभापती ललितकुमार शहा यांनी त्यांचा सत्कार केला. सचिव मधुकर गुंजकर, संचालक संभाजी वायाळ, सहायक सचिव भास्कर शिंदे, दिलीप पाटील, नंदू गायकवाड, सतीश भोसले आदी उपस्थित होते. या वेळी त्यांना एमआयडीसीतील नवीन बाजारपेठेची माहिती देण्यात आली. याकरिता सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच एमआयडीसी भागात वृक्षलागवडीसाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जी. श्रीकांत यांनी केले. 

Web Title: Tur issue in latur