तूर खरेदीसाठी खंडपीठात आणखी एक याचिका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

औरंगाबाद - शेतकऱ्यांकडील सर्व तूर सरकारने खरेदी करावी किंवा व्यापारी खरेदी करत असलेली तुरीची रक्कम आणि हमीभावाची रक्कम यातील तफावत रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यावी, अशी विनंती करणारी आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. दोन्ही याचिकांवर शुक्रवारी (ता. 5) एकत्रित सुनावणी होणार आहे.

अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करावी यासाठी याचिका दाखल केली. त्यापाठोपाठ लातूर येथील शिवाजीराव विठ्ठलराव माने यांनीही याचिका दाखल केली आहे. त्यानुसार मराठवाड्यातील केंद्रांवर चार लाख साठ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असून, शेतकऱ्यांकडे पाच ते सात लाख क्विंटल तूर पडून आहे.

Web Title: tur purchasing petition in court