हरभरा, तुरीच्या हमीभावासाठी शेतकरी संघटनेचा जेलभरो

हरी तुगावकर
सोमवार, 14 मे 2018

लातूर: तूर व हरभऱयाची हमी भावाने खरेदी करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱय़ा शासनाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. 14) येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. हमी भावापेक्षा कमी भावाने तूर व हरभऱयाची खरेदी झाल्याने शासनाने फरकाची रक्कम द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लातूर: तूर व हरभऱयाची हमी भावाने खरेदी करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱय़ा शासनाच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. 14) येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. हमी भावापेक्षा कमी भावाने तूर व हरभऱयाची खरेदी झाल्याने शासनाने फरकाची रक्कम द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

राज्य शासनाने तूर व हरभऱयाची हमी भावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु केली आहेत. ती नावालाच आहेत. जिल्यात या वर्षी 1 लाख 10 हजार हेक्टर वर तूर तर 2 लाख 51 हजार हेक्टर वर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. सरकारी आकडेवारी नुसार प्रति हेक्टरी उत्पादकता धरली तर तुरीचे उत्पादन किमान 14 लाख क्विंटल झाले आहे तर हारभऱ्याचे 25 लाख क्विंटलचे उत्पादन झाले आहे. 14 लाखापैकी सरकारने फक्त आतापर्यंत 1 लाख 85 हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे. तर 25 लाखापैकी  आतापर्यंत फक्त 35 हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. मग बाकी माल हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमी दराने बाजारात विकला जात आहे. अजूनही तूर 4 लाख क्विंटल व हरभरा 5 लाख क्विंटल जरी सरकारने खरेदी केला तरीही  तुरीत किमान 100 कोटी तर हरभऱ्यात 200 कोटींचा तोटा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे. या नुकसानीला सरकार जबाबदार आहे. तूर, हरभरा खरेदीकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिली.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याकडे लक्ष घातले नाही. लातूर हे आशिया खंडातील सर्वात मोठा तूर व हरभरा उत्पादक जिल्हा आहे, म्हणून या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची फार मोठी जबाबदारी होती. पण त्यांनीही दूर्लक्ष केले. त्यांनी एक तर शेतकऱ्यांना त्याच्या फरकाची रक्कम मिळून द्यावी, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी श्री. सस्तापुरे यांनी केली. टाऊन हॉल येथे संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून नंतर सोडून दिले. या आंदोलनात श्री. सस्तापुरे, विमलताई आकनगीरे, वसंत कंदगुळे, दत्तू कंदगुळे, शिवराज ढोरमारे, कचरू देशमाने, अऩंत दोडके पाटील, शंकर नरवटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: tur rate and farmer jail