काटा सुरू अन्‌ आवकही वाढली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जळकोट - येथील तूर खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर घेऊन येत आहेत. 

जळकोट - येथील तूर खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात केंद्रावर तूर घेऊन येत आहेत. 

चांगला भाव मिळत असल्याने जळकोट, कंधार, मुखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केंद्रावर तूर आणली आहे. आजपर्यंत 1381 शेतकऱ्यांची बावीस हजार तीनशे चाळीस क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. अचानक तूर खरेदी केंद्र बंद पडल्याने तब्बल दहा हजार क्विंटल तुरीचे वजन होणे बाकी होते. याबाबत "सकाळ'ने तूर खरेदी बंदची बातमी प्रकाशित करताच जिल्हा फेडरेशनने पुन्हा बाजार समितीला खरेदी केंद्र चालू करण्याचे आदेश दिले. खरेदी केंद्र चालू झाल्याची बातमी शेतकऱ्यांना कळताच आणखी शेकडो क्विंटल तूर बाजार समितीच्या प्रांगणात आली आहे. सदरील केंद्र हे पंधरा मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने सर्वच शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा होणार आहे. 

""जळकोट येथे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. बाजार समितीकडून दोन काटे चालू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून पंधरा मार्चपर्यंत वजन सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीला सहकार्य करावे.'' 
-मन्मथ किडे, सभापती, बाजार समिती, जळकोट 

""तूर खरेदी केंद्र चालू झाल्याने समाधान वाटत असून बाजार समितीकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या टोकननुसार वजन करून घेतले जात असल्याने समाधान वाटत आहे.'' 
-धनंजय भ्रमण्णा, शेतकरी, जळकोट 

Web Title: turdal increased arrivals

टॅग्स