बारा दिवसांनी मृतदेह सापडला 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

घाटनांदूर (बीड) - दर्शनासाठी घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह कन्हेरवाडीजवळील (ता. परळी) घाटात रविवारी (ता. 22) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. 

पट्टीवडगाव (ता. अंबाजोगाई) येथील भानुदास राम वाकडे (वय 80) हे परळी येथील मुलगी सुशालाबाई भागोजी शिंदे हिला भेटण्यासाठी गेले होते. मंगळवारी (ता. दहा) वैद्यनाथाचे दर्शन करून येतो म्हणून घराबाहेर पडलेले भानुदास वाकडे परत आलेच नाहीत.

त्यांच्याजवळ चाळीस हजार रुपये, बोटात पाच ग्रॅमची अंगठी व कानात कुंडल असल्याची माहिती नातेवाइकांकडून मिळाली. पैशाच्या मोहापोटी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परळी येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर पट्टीवडगाव येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve days later the body was found

टॅग्स