जालन्यात विलगीकरण कक्षात बारा रुग्ण दाखल 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी परदेशातून तसेच इतर परराज्यातून आलेल्या प्रवाशांना जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. गुरूवारी (ता.दोन) बारा जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

जिल्हा सामान्य रूग्णालयातील विलगीकरण कक्षात आतापर्यंत १०४ जण दाखल होते. त्यापैकी १०४ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले असून त्यापैकी ८९ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह प्राप्त आले आहे. तर तिघांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले असून सध्या दाखल असलेल्या बारा जणांचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाला प्राप्त होणार आहे.

सध्या १६ रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयातुन सुट्टी मिळालेल्या तसेच परदेशाहून आलेल्या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.

आजपर्यंत ११४ परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी ११३ व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या १३ हजार १०५ व्यक्तींची तपासणी करुन त्यांचेही घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. 

बदनापुरात आतापर्यंत ५५० जणांचे होम क्वारंटाईन 

बदनापूर - तालुक्यात पुणे - मुंबईसह विविध जिल्ह्यातून आतापर्यंत आलेल्या जवळपास ५५० हुनअधिक लोकांना होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला, आरोग्य विभागाने दिला आहे. 

बदनापूर तालुक्यात दोघा कोरोना संशयितांपैकी एका तरुणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दुसऱ्याची अद्याप तपासणी करण्यात आलेली नाही. तालुक्यात सध्या एकही रुग्ण विलगिकरण कक्षात नाही. मात्र बाहेर जिल्ह्यातून आलेल्या साडेपाचशेहून अधिक रुग्णांना होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. बदनापूर तालुक्यात मुंबईहून परतलेल्या तरुणाचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

खुलताबादहुन बदनापूरला आलेल्या व्यक्तीला कोरोनाच्या संदर्भातील ठोस लक्षणे दिसून येत नसल्यामुळे त्याची तूर्त कोरोना तपासणी करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे त्यास काही दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी (ता. एक) सांगलीहून मांजरगाव (ता. बदनापूर) येथे आलेल्या एका कुटुंबाला होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्यात कोरोनाशी संबंधित कुठलीही लक्षणे दिसून आली नाहीत. अशी माहिती बदनापूर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओम ढाकणे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com