ऍट्रॉसिटी प्रकरणात बारा जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - लोणी (ता. खुलताबाद) येथील महिलेस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बारा जणांवर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या बारा जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. भालेराव यांच्यासमोर हजर केले असता बारा जणांना सोमवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

लोणी येथील अनुसूचित जातीची महिला गायरानावर लाकडे तोडत असताना "काठ्या का तोडतेस' म्हणून विचारणा करून गावातील बारा जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोणी गावातील गफूर कालू पटेल (60), हशम कालू पटेल (65), सलीम कालू पटेल (40), नदीम पटेल (22), निसार हाशम पटेल (23), मोईम सांडू पटेल (23), नजीम अब्दुल रहेमान (28), मुसा सांडू पटेल (50), सिराज शेख चॉंद पटेल (35), कडू बाबूलाल पटेल (43), रऊफ अफजल पटेल, नय्युम शेख रहीम पटेल यांना शुक्रवारी रात्री अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी सर्वांना न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी बारा जणांच्या जामिनास विरोध करत पुढील तपासासाठी पोलिस कोठडीची विनंती केली. यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले. 

Web Title: Twelve people arrested on the atrocity case