जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी कोरोना फोर्समध्ये बारा हजार जवान; आठशे गावात फोर्स

Latur District Collector's Anti Corona Force
Latur District Collector's Anti Corona Force

लातूर : जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींमुळेच कोरोनाचा शिरकाव झाला. पुन्हा असा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यातील सर्व गावांत अॅंटी कोरोना फोर्स (एसीएफ) अर्थात कोरोनाविरोधी दलाची स्थापना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला असून दोनच दिवसात जिल्ह्यातील आठशे गावांत एसीएफची स्थापना झाली आहे. सुमारे बारा हजार ग्रामस्थ जवान म्हणून या दलात सहभागी झाले आहेत. त्यापुढे जाऊन गावागावात येणाऱ्या दीड हजार रस्त्यांवर लोकसहभागातून तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारले असून मुंगी देखील गावात प्रवेश करणार नाही, असा खडा पहारा जवानांनी सुरू केला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोनाच्या आपत्तीला लढा देण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी ठरणार नाही. समाजातील सर्व घटक आणि प्रत्येकांनी सक्रीय सहभाग दिल्याशिवाय कोरोनाला हद्दपार करता येणार नाही. याची जाणीव ठेऊनच जिल्हाधिकारी श्रीकांत सुरवातीपासून लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत. त्यांचा अॅंटी कोरोना पोलिस (एसीपी) उपक्रम राज्यभर गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाची प्रशंसा करून तो राज्यभर राबवण्याच्या सूचना केल्या. एसीपी उपक्रमाने कोरोनाला घराबाहेर रोखण्यात यश आले. प्रशासनाने कोरोनाला जिल्हाबाहेर रोखून धरले. या स्थितीत कोरोनाला गावाबाहेर रोखण्याची गरज पुढे आली.

कोरोनाबाधित रूग्णांच्या सहवासात राहून पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातून काही व्यक्ती गुपचूप ग्रामीण भागात येऊन राहू लागल्या. काही प्रकार उघड झाल्याने जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी अॅंटी करोना फोर्सचा उपक्रम सुरू केला. सर्व गावात एसीएफची स्थापना करण्याचे आणि फोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या आवाहनाला दोन दिवसात उंदड प्रतिसाद मिळाला. उपक्रमाच्या निमित्ताने गावातील लोक मतभेद विसरून एकत्र आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

कोरोनाला दूर ठेवण्याची जबाबदारी आपलीही आहे, असे समजून कामाला लागले. यामुळे फोर्सच्या स्थापनेनंतर गावात येणाऱ्या रस्त्यांची निवड करून त्यावर लोकसहभागातून तपासणी नाके उभारण्यात आले. या नाक्यांवर अहोरात्र पहारा देण्यासाठी फोर्समध्ये जवान म्हणून काम करण्यासाठी युवक, ग्रामस्थ, माजी सैनिक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह सर्व घटकांतील लोकांनी नोंदणी करत सहभाग दिला. यामुळे कोरोनाला सोबत घेऊन येणारा माणूस तर सोडाच मुंगी सुद्धा गावात प्रवेश करू शकणार नाही, असे चित्र निर्माण गावागावात तयार झाले आहे.

जवान होण्यासाठी नोंदणी सुरूच
जिल्ह्यात ७८५ ग्रामपंचायती असून ९३१ गावे आहेत. यापैकी शुक्रवारपर्यंत (ता. १७) ८०१ गावांत एसीएफची स्थापना झाली आहे. उर्वरित गावातही प्रक्रिया सुरू होती. फोर्समध्ये तब्बल बारा हजार ४३८ युवक व ग्रामस्थांनी जवान म्हणून नोंदणी करत गावच्या रक्षणासाठी चेकपोस्टवर कर्तव्य बजावण्यास सुरवात केली आहे. ८०१ गावांत मिळून एक हजार ५२४ रस्त्यांची निवड चेकपोस्टसाठी करण्यात आली असून त्यापैकी एक हजार ४७६ रस्त्यावर चेकपोस्टची स्थापन करण्यात आले आहे. जवानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेकजण ऑनलाईन लिंकवर नोंदणी करत एसीएफचे जवान म्हणून काम करण्याची संधी मागताना दिसत आहेत.

अॅंटी कोरोना फोर्स उपक्रमाला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावच्या रक्षणासाठी पुढे आलेल्या जवानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. शहराच्या ठिकाणीही एसीएफ उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे. एसीएफच्या निमित्ताने गावागावात  लोक मतभेद विसरून एकजुटीने पुढे आले आहेत. त्यांच्या एकजुटीमुळेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला हत्तीचे बळ आले आहे. गावागावांत एसीएफच्या बटालियन स्थापन होत असून बटालियनमधील सर्व जवानांचा मला अभिमान आहे.
- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

Twelve  Thousand Jawan Inducted In Latur District Collector's Anti Corona Force latur News CoronaVirus Covid19

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com