चाकूर तालुक्यात २५ लाखांचा गुटखा पकडला, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

प्रशांत शेटे
Tuesday, 29 December 2020

लातूर रोड (ता.चाकूर) येथे एक ट्रकमध्ये २५ लाख रूपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता.२९) पहाटे पकडला.

चाकूर (जि.लातूर) : लातूर रोड (ता.चाकूर) येथे एक ट्रकमध्ये २५ लाख रूपयांचा गुटखा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता.२९) पहाटे पकडला. या प्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी आणला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, बालाजी अट्टरगे, बळवंत भोसले, दिनेश हावा, लक्ष्मण कोरे, प्रमोद गोरे, परमेश्वर अंकुलगे, नंदकिशोर शेंडगे यांनी पहाटे तीनच्या सुमारास (एमएच १२ केपी ५०१५) क्रमांकाचा ट्रक पकडला.

 

 

यात गोवा कंपनीचा गुटखा होता. हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची मोजणी करण्यात आली. २४ लाख ८४ हजार रूपयाचा गुटखा व दहा लाख रूपयाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. याबाबत सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील यांच्या फिर्यादीवरून सुरेश वैद्यनाथ जाधव (रा.लंजवाड, ता.भालकी), ऱौफ रुक्मोद्दीन इनामदार (रा. केशर जवळगा, ता.उमरगा), ट्रक चालक रमेश रघुनाथ माने (रा. पुणे, समिर शेख रा. पुणे), जावेद पिराणी (रा.वसमत) या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Five Lakh Gutkha Seized In Chakur Block Latur News