वैद्यकीय प्रवेशासाठी वीस लाखाची फसवणूक 

प्रल्हाद कांबळे 
रविवार, 23 डिसेंबर 2018

नांदेड : सातारा येथील एका वैद्यकिय महाविद्यालयात एमडी मेडीसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्टर्सकडून वीस लाखाची रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : सातारा येथील एका वैद्यकिय महाविद्यालयात एमडी मेडीसीन प्रवेशासाठी येथील एका डॉक्टर्सकडून वीस लाखाची रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खमर हॉस्पिटलचे डॉ. जुनेद अहेमद महमद खुर्शीद (वय २९) यांना वैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे होते. त्यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या कृष्ण इन्स्ट्यूट ऑफ सायन्स मेडीकल कॉलेज येथे एमडी मेडीसीनच्या प्रवेशासाठी संपर्क साधला. यावेळी याच कॉलेजमधील काहीनी प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्यांनी तुम्हाला एमडी मेडीसीनचा प्रवेश देतो, यासाठी वीस लाख रुपये कॉलेजची फीस भरावी लागेल.
 

डॉ. जुनेद अहेमद यांनी त्यांच्या विश्वासात येऊन २८ एप्रिलला वीस लाख रुपये भरले. परंतु प्रवेश दिला नाही, त्याउलट पैसेही परत केले नाही. आजपर्यंत पैशाची सतत मागणी केली, मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अखेर डॉ. जुनेद यांनी वजिराबाद पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून सचीन शर्मा, संजयसिंह उमासिंह, गणेश उर्फ सागर लोहट, अदित्यसिंह अखिलेशसिंह, श्री. राजू, शिवाजी कुंभार आणि विजय दळवी सर्व राहणार कराड, सातारा यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज पांडे हे करीत आहेत. 
 

Web Title: Twenty lackhs fraud for medical admissions