जैताणेत २६ वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

commits suicide in jaitan
commits suicide in jaitan

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील संजयनगरमधील रहिवासी हरीश नानाभाऊ बोरसे (वय-२६) या तरुणाने मंगळवारी (ता.१७) दुपारी बाराच्या सुमारास वाजदरे (ता.साक्री) गावशिवारातील त्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

घडलेला प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने ताबडतोब त्यास जैताणे आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर हरिषला मृत घोषित केले. मयताचे काका त्र्यंबक पंडित बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कौतिक सुरवाडे घटनेचा पुढील तपास करत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अतिशय शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. तरुणाच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्येपूर्वी तयार केलेला अहिराणी भाषेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
हरिषने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेला अहिराणी भाषेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात हरिषने आपल्या पत्नीसह सासू-सासरे, शालक, मोठी मेहुणी व साडू यांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आपल्या आई-वडिलांना कोणीही त्रास देऊ नये व विम्याची रक्कम आपल्या मुलीच्या नावे ठेवण्यात यावी. व्यवसायातील भागीदाराने दीड लाख रुपये आपल्या आई-वडिलांना द्यावेत. पत्नी गरोदर असून सासूने गर्भ तपासणीचा आग्रह धरला होता. तपासणी न केल्यास पत्नीला माहेरी घेऊन जाण्याची धमकीही दिल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. रविवारी सायंकाळी त्यासंदर्भात निजामपूर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्याचेही हरिषने म्हटले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओबाबत नातेवाईक व पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com