SSC Result | जुळ्या बहिणींची कमाल, दहावीत मिळविले सारखेच गुण

दोन जुळ्या बहिणी लहानपणापासून विभक्त राहिल्या. दहावीची परीक्षा दोघींनी वेगवेगळ्या शाळेतून दिली.
Twin Sister Get Same Marks In SSC Exam
Twin Sister Get Same Marks In SSC Exam esakal

चाकूर (जि.लातूर) : दोन जुळ्या बहिणी लहानपणापासून विभक्त राहिल्या. दहावीची परीक्षा दोघींनी वेगवेगळ्या शाळेतून दिली असली तरी दोघींनी दहावीच्या (SSC Result) गुणात जुळवून घेत ८७.६० टक्के गुण मिळविण्याची किमया साधली आहे. अंकिता व निकिता या दोंघी जुळ्या बहिणी, दोघी दिसण्यामध्ये सारख्या यामुळे घरातील सर्वजण गोंधळून जायचे. यामुळे आईने लहानपणापासून दोघींना वेगवेगळे ठेवले. कुरळा (ता.कंधार) येथील भरत श्रीरामे हे चाकूर येथे खासगी नोकरी करतात. त्यांना जुळ्या मुली आहेत. (Twin Sisters Get Same Marks In SSC Board Examination In Latur Division)

Twin Sister Get Same Marks In SSC Exam
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा खोतांना टोला

यापैकी निकिता ही आई जवळ राहून येथील भाई किशनराव देशमुख विद्यालयात शिक्षण घेत होती, तर अंकिता ही गावाकडे आजी-आजोबा जवळ राहून कुरळा गावातील श्री शिवाजी विद्यालयात दहावीला होती. लहानपणापासून दोघी स्वतंत्र राहत होत्या. कधीतरी त्यांच्या भेटी होत असत. दोघी एकमेकांच्या संपर्कात राहून अभ्यास करीत होत्या. दहावीचा निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना समान ४३८ गुण मिळाले आहेत. जुळ्या बहिणींनी पंधरा वर्षे विभक्त राहिल्यानंतर दहावीच्या परीक्षेतील गुणातही जुळवून घेतल्याबद्दल दोघींचे भाई किशनराव देशमुख शाळेच्या मुख्याध्यापिक सुनिता कोयले, सहशिक्षिका वर्षा सांगवीकर यांनी अभिनंदन केले. (Latur News)

Twin Sister Get Same Marks In SSC Exam
SSC RESULT: लातूर विभागाच्या तब्बल ७० विद्यार्थ्यांनी मिळवले १०० % गुण

दोघींना समान गुण पडल्यामुळे आश्चर्यांचा धक्का बसला. परीक्षेच्या काळात आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो. अभ्यास स्वतंत्र केला. यापुढेही आम्ही दोघी लातूर येथे एकत्र अकरावी कला शाखेला प्रवेश घेणार आहोत.

- निकिता, अंकिता भरत श्रीरामे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com