दोन अपघातात एक ठार, एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला. बाळापूर गावानजीक दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला.

अजिंठा (जि.औरंगाबाद) ः अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार तर एकजण जखमी झाला. बाळापूर गावानजीक दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला.

बुधवारी (ता.दोन) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. अजिंठ्याकडून सिल्लोडकडे जाणारा ट्रक (एपी-16, टीक्‍यू-2113), विरुद्ध दिशेने समोरून येणारा टॅंकर ट्रक (पीबी-11, पीजे-3502) यांच्यात धडक झाली. यात टॅंकरचालक अवतारसिंग अमरजिंतसिंग (वय 36, रा. पटियाला (पंजाब) यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत महामार्गावरील अजिंठा घाटातील दरीत कंटेनर कोसळून चालक जखमी झाला. या दोन्ही अपघाताची अजिंठा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Accidents One Died