कोविड केअर सेंटरच्या अडीचपट रूग्ण गृहविलीकरणात, लातूर जिल्ह्यातील स्थिती

Coronavirus
Coronavirus

लातूर : जिल्ह्यात शनिवारी (ता.१७) ८३ कोरोनाचे रूग्ण आढळून आले तर चार रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दिवसभरात झालेल्या १६६ आरटीपीसीआर तपासणीत ३६, तर ५२१ जलद अँटिजेन तपासणीत ४७ पॉझिटिव्ह दिसून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या १९ हजार ३५४ वर तर मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ५६८ वर गेली आहे.

दरम्यान सध्या उपचार सुरू असलेल्या एक हजार २८८ रूग्णांपैकी तब्बल ६९४ रूग्ण घरूनच कोरोनाशी लढा देत असून ५९४ रूग्ण सरकारी यंत्रणेच्या सुविधेत उपचार घेत आहेत. यात कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या २६२ रूग्णांच्या अडीचपट रूग्ण गृहविलगीकरणात आहेत.जिल्ह्यात कोरोना साथीचा प्रसार दिवसेंदिवस आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख चार हजार ३०२ तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यात ६९ हजार ३९१ जलद अँटिजेन तपासणीत १२ हजार ७०७ पॉझिटिव्ह तर ३४ हजार ९११ आरटीपीसीआर तपासणीत सहा हजार ६४७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. सध्या सरकारी यंत्रणेच्या सुविधेत उपचार घेत असलेल्या ५९४ रूग्णांपैकी ७१ जण आयसीयूमध्ये, सातजण व्हेंटिलेटर, २७ जण बायपॅप, १७१ जण, मध्यम ऑक्सिजनवर १७१ तर मध्यम परंतू ऑक्सिजनवर नसलेले १२७ रूग्ण आहेत. तर उर्वरित २६२ जण कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. या सुविधेतील रूग्णांच्या शंभरहून अधिक रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. यामुळेच सध्या जिल्ह्यात सरकारी व खासगी रूग्णालये तसेच कोवीड केअर सेंटरच्या शिल्लक बेडची वाढून चार हजार ७५ वर गेली आहे.



लातूर कोरोना मीटर
एकुण रूग्ण - १९३५४
उपचार सुरू असलेले - १२८८
बरे झालेले - १७४९८
एकूण मृत्यू - ५६८
आजचे मृत्यू - ४
आजचे रूग्ण - ८३


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com