अडीच कोटी थकविणाऱ्या "भीमाशंकर'वर जप्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

नांदेड - उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना पैसे न दिल्याप्रकरणी पारगाव (ता. वाशी, जिल्हा उस्मानाबाद) येथील भीमाशंकर शुगर मिल लिमिटेड या खासगी साखर कारखान्यावर साखर आयुुक्तांनी "आरआरसी‘ दाखल केली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश बजाविले आहेत.
 
नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागात येणाऱ्या कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होऊन त्यांना वेळेत पैसे न दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या दोन फेब्रुवारी 2016च्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या कारखान्याची मालमत्ता जप्त करून त्यांना रक्कम देण्याचे फर्मान राज्याच्या साखर आयुक्तांना बजाविले होते.

Web Title: Two and a half million thakavina "bhimasankara seized