व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघे जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

वैजापूर  - व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. तर अन्य तिघे पळून गेले. त्यांच्याकडून मिरचीपूड, कोयता, लाकडाचा दांडा, दोरी, दोन मोबाईलसह दरोड्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. औरंगाबाद येथील विशेष पथक व स्थानिक पोलिसांनी शनिवारी (ता.19) चार वाजता उक्कडगाव रस्त्यावर शेळके वस्तीजवळील शेतात ही कारवाई केली. 

शुभम शाहिरी चव्हाण (वय 20, रा. शिंगणापूर, ता. कोपरगाव), बाळू देसाई काळे (वय 35, रा. आडगाव निपाणी, ता. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार प्रवीण शाहिरी चव्हाण, अन्याबाई शाहिरी चव्हाण व एक अनोळखी व्यक्ती हे तिघे पसार झाले आहेत. उक्कडगाव रस्त्यावर शेळके वस्तीजवळ पालेजा यांच्या शेतात एक टोळी व्यापाऱ्याला नकली सोने देऊन लुटण्यासाठी येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक विलास हजारे, कॉन्स्टेबल कुकलारे, लोखंडे, राठोड, वसावे व चालक जाधव यांनी वैजापूर पोलिसांना माहिती देऊन टोळीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला. सहायक पोलिस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव, सचिन सोनार, श्री. डांगे, श्री. दंडगव्हाळ, श्री. थोरात, श्री. चव्हाण, श्री. शेळके, श्री. पैठणकर, श्री. विघे, श्री. अभंग यांचे पथक खासगी वाहनाने शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांना पाहून दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी पाठलाग करून दोघांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, उपनिरीक्षक विलास हजारे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: two arrested in vaijapur