खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

औरंगाबाद - हर्सूल परिसर, कोलठाणवाडी येथे खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. सोहेल शफिक पठाण (वय 11) आणि शेख युसूफ शेख युनूस (वय 13, रा. यासीन कॉलनी, हर्सूल) अशी मृतांची नावे आहेत.

कोलठाणवाडीतील अरबी शाळेजवळ एका शेतात खड्डा तयार करण्यात आला आहे. पावसामुळे हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर सोहेल व युसूफ घरी गेले. त्यानंतर कोलठाणवाडीच्या शेतातील खड्ड्यात पोहण्यासाठी गेले. पोहताना पाण्यात बुडाले.

Web Title: two boys drown death

टॅग्स