दोन मुले जायकवाडीच्या कालव्यात गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

गेवराई (जि. बीड) - जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात पोहायला गेलेले दोघे पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊन बेपत्ता झाल्याची घटना रविवारी तालुक्‍यातील राक्षसभुवन जवळ घडली. महेश गणेश बहीर (वय 17) व राम चंद्रकांत भिताडे (वय 18) अशी वाहून जाऊन बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. गंगावाडी (राक्षसभुवन) येथील महेश गणेश बहीर व राम चंद्रकांत भिताडे यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. दोघेही शहागड (जि. जालना) येथे टंकलेखनाचा वर्ग करतात. रविवारी नियमित टंकलेखनाचा वर्ग करून परतल्यानंतर दोघांनी दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावर पोहायला गेले. राक्षसभुवनजवळील पुलाजवळ कालव्यात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन दोघेही बेपत्ता झाले. उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता.
Web Title: two boys missing in jayakwadi canel

टॅग्स