बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावावर काळाने घाला घातला आहे. लिबगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टच्या सकाळी नऊच्या सुमारास घडली. आज रक्षाबंधन असल्यानेही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नांदेड : चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्ख्या भावावर काळाने घाला घातला आहे. लिबगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना 15 ऑगस्टच्या सकाळी नऊच्या सुमारास घडली. आज रक्षाबंधन असल्यानेही परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दोन्ही मयत पूर्णा तालुक्यातील कमळापुर येथील रहिवासी आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघे जण आपल्या दुचाकीवरून मुदखेड येथील चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाण्यासाठी सकाळी निघाले असता लीबगाव पाटीजवळ येतात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते दोघेही जागीच ठार झाले.

दोघांवरही लिबगाव रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, घटनास्थळावरून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केल्याचे लिबगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश शेळके यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनांमुळे कमळापूर गावावर शोककळा पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two brothers death in accident on the Rakshabandhan occasion