शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू; कुटूंबात राहील्या दोनच महिला

वैजिनाथ जाधव
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

दोन सख्ख्या भावांचा शेततळयात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सिरसमार्ग येथे बुधवारी (ता. ३०) घडली. विकास सुदाम ठोंबर (वय २४) व गणेश सुदाम ठोंबरे (वय २२) अशी या भावंडांची नावे आहेत.

गेवराई - दोन सख्ख्या भावांचा शेततळयात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सिरसमार्ग येथे बुधवारी (ता. ३०) घडली. विकास सुदाम ठोंबर (वय २४) व गणेश सुदाम ठोंबरे (वय २२) अशी या भावंडांची नावे आहेत.

त्यांच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता, त्यामुळे कुटुंबात केवळ दोन महिला राहिल्या आहेत. 

जिल्ह्यात मागच्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने जलस्त्रोतांतील पाणीवाढले आहे. यामुळे शेततळेही पाण्याने भरले आहेत. सिरसमार्ग ता. गेवराई येथे ठोंबरे कुटुंबातील विकास (वय २४ ) आणि गणेश (वय २२ ) हे दोघे बुधवारी शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. शेततळ्याशेजारी असताना विकासाचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गणेश देखील शेततळ्यात पडला. दोघांचाही शेततळ्यात बुडाल्याने मृत्यू झाला . 

घर उघड्यावर; दोन्ही महिलाच
विकास आणि गणेश हे दोघे सख्खे भाऊ होते. त्यांचे वडील सुदाम ठोंबरे यांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. यातील विकासाचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. आता ठोंबरे कुटुंबात मयत विकासची पत्नी आणि आई या  दोघीच उरल्या आहेत. उघड्यावर पडलेल्या घरातील दोन महिलांना आधाराची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brothers death by drown