हिंगोली : सख्ख्या लहान भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

hingoli
hingoli

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या उटीब्रह्मचारी गावात खेळत असताना गावाजवळ असलेल्या बारवमध्ये पडून दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत दोन चिमुकल्यांमध्ये हर्षल राजू खरादे (वय ४), समर्थ राजू खरादे (वय ७) यांचा समावेश आहे. गावा शेजारी एक पुरातन काळातील बारव आहे आणि या बारवमध्ये गावातील महिला हे धुणे धुण्यासाठी नेहमीच जात असतात. आपली आई देखील त्या ठिकाणी गेली असावी म्हणून ही बालके खेळत खेळत या बारवकडे गेली होती. मात्र, यातील पार्थचा पाय घसरून तो पाण्यात पडला व त्यानंतर सोबत असलेला हर्ष देखील पाण्यात पडला. या घटनेत या दोघांचाही दुर्दैवी अंत झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी या बारावकडे धाव घेत या दोघांचा शोध सुरू केला. मात्र ही बारव खोल असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.अखेर ग्रामस्थ व
सेनगाव पोलिसांना रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह काढण्यात यश आले. दरम्यान वर्षभरातील महत्त्वाचा असलेला दसरा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना,
दोन सख्ख्या चिमुकल्या भावांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सेनगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com