वैजापूर मतदारसंघात दोघांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसअखेर दोनजणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले तर तीस उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. ऍड. कैलास संपतराव खांडबहाले (रा. महिरावणी, ता. जि. नाशिक) यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी प्रहार संघटनेकडून अर्ज दाखल केला. तीसजण उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः वैजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसअखेर दोनजणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले तर तीस उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. ऍड. कैलास संपतराव खांडबहाले (रा. महिरावणी, ता. जि. नाशिक) यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके यांनी प्रहार संघटनेकडून अर्ज दाखल केला. तीसजण उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. शिवसेनेची उमेदवारी तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे यांना जाहीर झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला.

सिल्लोड मतदारसंघातून इच्छुकांनी
घेतले 75 उमेदवारी अर्ज

सिल्लोड, ता. 30 (बातमीदार) : सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या जागेसाठी सोमवारपर्यंत (ता. 30) 75 उमेदवारी अर्ज इच्छुक घेऊन गेले आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी शुक्रवारी (ता. चार) अंतिम मुदत असताना पुढील
चार दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात गर्दी वाढणार आहे. यासाठी या कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने
विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. कार्यालयाच्या परिसरात गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्‍यक तो बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पुढील चार दिवस उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही गर्दी येथे वाढणार असल्यामुळे कार्यालयाकडे येणारे रस्तेही आवश्‍यक त्या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Candidates Filed Nomination In Vaijapur Constituncy