सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

- सुट्टीसाठी आला होता मामाकडे. 

- पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू.

जिंतूर : घराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा गाळात अडकून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी (ता.२४) दुपारी तीनच्या सुमारास कुऱ्हाडी येथे घडली. 

पवन दिलीप आढे (वय १४,रा.मंठा) व करण सुभाष निकाळजे (वय ८,रा.कुऱ्हाडी) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत समजलेल्या माहितीनुसार, पवन आढे हा मंठा येथे नवव्या वर्गात शिकत असून, सुट्टी असल्यामुळे तो कुऱ्हाडी येथे त्याचे मामा नारायण पांडू राठोड यांच्याकडे आला होता. तो आणि गावातीलच तिसरीच्या वर्गात शिकत असलेला करण निकाळजे हे दोघे दुपारी ऊन्हाचेवेळी घराशेजवळ असलेल्या तलावावर अंघोळ करण्यासाठी गेले होते. दोघांनाही पोहता येत नसल्याने ते तलावातील गाळात अडकले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना शेतात शेळ्या चालणारी मुलगी निशा नारायण राठोडने पाहिली व याबाबत गावात येऊन सांगताच लग्नातील गावकरी मंडळीने तलावाकडे धाव घेतली.

भागवत कापुरे, देविदास इंझे, केशव इंझे, कल्याण इंझे, नारायण इंझे, लक्ष्मण काजळे,राम काजळे पाटील या तरुणांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले.

Web Title: Two Child Died Due to Drowning in the lake