esakal | दोन बालविवाह उस्मानाबाद जिल्ह्यात रोखले, जिल्हा प्रशासनाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

0child_marriage

दोन बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती.

दोन बालविवाह उस्मानाबाद जिल्ह्यात रोखले, जिल्हा प्रशासनाची कारवाई

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद  : गंभीरवाडी आणि उस्मानाबाद येथील सेवालाल कॉलनीत होणारे दोन नियोजित बालविवाह जिल्हा महिला व बालविवाह अधिकारी बी. एच. निपाणीकर यांनी रोखले आहेत. दोन बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्या आधारे कळंबच्या बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. व्ही. सांगळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए. बी. कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. ग्रामबाल संरक्षण व वॉर्ड बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने हे नियोजित बाल विवाह रोखण्यात यश आले आहे.

हे बालविवाह रोखण्यात गंभीरवाडी (ता. कळंब) येथील बाल विवाह प्रतिबंध समिती सदस्या ज्योती सपाटे यांच्या पुढाकाराने हे दोन्ही बाल विवाह वधू व वर यांचे समुपदेशन करून तसेच त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन थांबविण्यात आले. या कामी ए. पी. मोहिते, बालसंरक्षण अधिकारी विभावरी खुने, समुपदेशक कोमल धनवडे, प्रज्ञा बनसोडे, गंभीरवाडीचे ग्रामसेवक व्ही. के. लांडगे, गंभीरवाडीच्या अंगणवाडी कार्यकर्त्या गंगाबाई देवकर, अर्चना देवकर पोलिस हवालदार ए. बी. नाईकवाडी, बी. डी. तांबडे, पोलीस पाटील अशोक माने, संतोष देवकर, औदुंबर माने, पांडुरंग गव्हाने, अश्रुबा गाडे, अश्विनी गव्हाने, बालाजी गुंड व नवनाथ गव्हाणे यांनी प्रयत्न केले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image