तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शेतातून आंबे आणल्यानंतर हातपाय धुण्यासाठी संकेत रामनाथ लगस (वय 8, रा. धनगरजवळका, ता. पाटोदा), आदित्य परसराम सापनकर (6, रा. पिंपरगव्हाण) हे मावसभाऊ मंगळवारी (ता. नऊ) रात्री पिंपरगव्हाणच्या तलावात उतरले. यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला

बीड - तलावात बुडून दोन शालेय मुलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपरगव्हाण (ता. बीड) येथे घडली. पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे अशाच घटनेत बुडालेल्या दोन मुलांना वाचविण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शेतातून आंबे आणल्यानंतर हातपाय धुण्यासाठी संकेत रामनाथ लगस (वय 8, रा. धनगरजवळका, ता. पाटोदा), आदित्य परसराम सापनकर (6, रा. पिंपरगव्हाण) हे मावसभाऊ मंगळवारी (ता. नऊ) रात्री पिंपरगव्हाणच्या तलावात उतरले. यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी रात्री उशिरा दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. बीड ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला.

दोघांवर उपचार
पाडळशिंगी (ता. गेवराई) येथे बारीक किसन धुताडमल (12, रा. पाडळशिंगी), अशोक थोरात (13) हे खेळत खेळत तलावाकडे गेले. पाय घसरून दोघेही तलावात बुडत असताना परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना वाचविले. पाण्याबाहेर काढून त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: two dead in beed

टॅग्स