जीपच्या धडकेत काका-पुतण्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

गंगापूर - औरंगाबाद-पुणे महामार्गावर पतंजली कंपनीजवळ (ता. नेवासा) जीपची दुचाकीला मागून जोरात धडक बसल्याने भोयगाव (ता. गंगापूर) येथील चुलत काका-पुतण्या ठार झाले. जीपचालक फरारी आहे. शनिशिंगणापूर येथील मुलीला सोमवारी (ता. 14) भेटण्यासाठी जात असताना ही घटना घडली.

या अपघातात चुलते कल्याण वामन पाठे (वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चुलत पुतण्या संजय रावसाहेब पाठे (वय 46) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. नेवासा (जि. नगर) येथील पोलिस ठाण्यात जीपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: two death in accident