उष्माघाताने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील प्रकाश अशोक जाधव 
(वय २५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. जाधव हे जनावरांना घेऊन गुरुवारी (ता. ३०) शेतात गेले होते. शेतावर काम करीत असताना त्यांना उन्हाचा तडाखा बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना ही बाब सायंकाळी उशिरा समजली.

नांदेड, हिंगोली - नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. 

नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील प्रकाश अशोक जाधव 
(वय २५) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना उष्माघाताने मृत्यू झाला. जाधव हे जनावरांना घेऊन गुरुवारी (ता. ३०) शेतात गेले होते. शेतावर काम करीत असताना त्यांना उन्हाचा तडाखा बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना ही बाब सायंकाळी उशिरा समजली.

माळापूर (ता. वसमत) येथील जनार्धन गणपतराव ढोरे (वय ६५) शुक्रवारी (ता. ३१) वसमतला आले होते. त्यांना उन्हाचा फटका बसल्याने उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील उष्माघाताचा हा दहावा बळी आहे.

परभणीत पारा ४५.६ अंशांवर
परभणी : शनिवारी (ता. १) ढगाळ वातावरणामुळे तापमान दोन अंशांनी घसरले होते. रविवारी मात्र वातावरण पूर्वीसारखे तप्त होऊन परभणीत कमाल तापमान ४५.०६ अंश नोंदले गेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Death by Sunstroke Summer