वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

गेवराई (जि. बीड) - पोहताना वाहून गेलेल्या दोन मुलांचे मृतदेह सोमवारी (ता. 14) आढळून आले. गंगावाडीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेवराई (जि. बीड) - पोहताना वाहून गेलेल्या दोन मुलांचे मृतदेह सोमवारी (ता. 14) आढळून आले. गंगावाडीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेवराई तालुक्‍यातील गंगावाडी येथील महेश गणेश बहीर (वय 17) व राम चंद्रकांत भिताडे (वय 18) हे दोघे रविवारी (ता. 13) राक्षसभुवनजवळील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात पोहण्यासाठी उतरले. दोघेही पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले. त्यांचा रविवारी शोध घेण्यात येत होता. सोमवारी सकाळी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर दोघांचे मृतदेह आढळून आले.

Web Title: two deathbody receive