पाथरी, उमरी तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पाथरी - पाथरगव्हाण (ता. पाथरी) येथे गेल्या रविवारी विष घेतलेले शेतकरी शिवाजी बाबासाहेब घांडगे (वय 55) यांचा परभणी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यांची आठ एकर शेती असून, बॅंकेचे तीन लाख रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. घरातून विष आणून त्यांनी गावातील चावडीसमोर घेतले. विषाचा रिकामा डबा दिसल्यामुळे ग्रामस्थांनी पाहणी केली असता, हा प्रकार लक्षात आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले.

उमरी तालुक्‍यात आत्महत्या
उमरी - नापिकी, कर्जामुळे जामगाव (ता. उमरी) येथील शेतकरी पांडुरंग शंकर सावंत (वय 60) यांनी शनिवारी सकाळी घरी विष घेतले. उमरीत प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: two farmer suicide